*पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीतून जनजागृती*
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या आणि जायंटस ग्रुप ऑफ परिवार बेलगाम, वेणुग्राम मल्टी परपज को ऑपरेटिव्ह सोसायटी,साई स्पोर्ट्स अकॅडमी बेलगाम यांच्या वतीने पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये वय वर्ष ३ ते २५ वर्षाच्या ३५० स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. या स्केटिंग रॅलीची सुरुवात गोवावेस स्विमिंग पूल पासून बेळगाव शहराचे प्रथम नागरिक व महापौर मंगेश पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ माधव प्रभू यांनी स्केटिंग पटूंना पाणी वाचविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.या उद्घघाटन प्रसंगी नगरसेवक जयंत जाधव,नितीन जाधव, समाजसेवक राकेश कलघटगी, जायंटस ग्रुप ऑफ परिवार चे अध्यक्ष सचिन केळवेकर, साई स्पोर्ट्सच्या संचालिका राजलक्ष्मी हलगेकर, समाजसेविका भक्ती शिंदे, तानाजी शिंदे, जायंटस ग्रुप चे श्री त्रिवेदी,स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पाणी वाचवा जीवन वाचवा पाणी आडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा देत स्केटिंग रॅली दोन किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण केली. रॅली पूर्ण झाल्यानंतर या रॅलीचा उद्देश समजावून देऊन या रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्केटिंग पट्टूला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ही रॅली यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर, दीपक सुतार,मंजुनाथ दोड्डमनी , विठ्ठल गंगणे राज कदम गणेश दडीकर, तानाजी शिंदे, जायंटस चे त्रिवेदी, या सर्वांचे परिश्रम लाभले.