खानापुर वाचवा! पाऊस वाचवा! शेतकरी वाचवा!
खानापूर येथील शेतका-यांना कर्नाटक सरकारनी त्यांची जमीन स्वाधीकरणा बाबत नोटीस पाठवली आहे. भांडुरा नाल्याचे पाऊस मोठ्या पाईपद्वारे धारवाड जिल्यातील गावाना पुरवण्यासाठी जी योजना केलीय त्यासाठी शेतकऱ्यांच्या उपजावू जमिनी ताब्यात घेण्याचा घाट सरकारने घातला आहे. या योजनेमुळे खानापूरच्या शेतकयांच्या जमिनी व पाऊस यांची ताबडतोबीनं हानी होणार आहे.https://dmedia24.com/the-next-hearing-on-the-deportation-of-shubham-shelke-on-april-21/
येवढेच नाही तर या पाण्यावर अवळंबून असणारे जंगल नष्ट होऊन खानापूरचाच नव्हे तर अख्या उत्तर कर्नाटकातील पाऊस कमी होणार आहे व वाळवंटीकरणाचा वेग वाढणार आहे.
खानापूर चा पाऊस, पाणी, शेती व शेतकरी वाचवण्यासाठी आपण एकजुटीने काय करायचे हे ठरवण्यासाठी कामाला लागायला हवे. त्यासाठी जात, धर्म, भाषा, पक्ष इत्यादी सारे भेद विसरून पुढीक योजना ठरविण्यासाठी बुधवार दिनांक ९ एप्रिल रोजी १०.३० वाजता वागळे कालेज (खानापूर बस स्टॅंड समोर) येथिल सभेसाठी स्त्री-पुरुष नागरिकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती
आपले नम्र,
श्री. दिलीप कामत
डॉ. शिवाजी कागणीकर
श्री. सुजित मुळगुंद
कॅप्टन नितिन धोंड
वकील श्री नागप्पा लातूर
श्री. जगदीश होसमनी
श्री मल्लिकार्जुन वाली
श्री सिद्धगौडा मोदगी
श्रीमती शारदा गोपाळ
श्रीमती गीता साहू
श्री. काशीनाथ नाईक
श्री. शंकरण्णा लंगटी
श्री. बसनागौडा पाटील
श्री. विल्सन कार्व्हालो
अधिक माहितीसाठी संपर्क करा
मराठी – कॅप्टन नितिन धोंड : 9986901212
कन्नड – सुजित मुळगुंद. : 70261 27479