शनिवारी 15 वा फोन-इन कार्यक्रम
जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीम शनिवारी 15 वा फोन-इन कार्यक्रम सकाळी 9 ते 11 या वेळेत करणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील जनतेचा प्रश्न केवळ एका फोनने सोडवणे शक्य आहे. फोन-इन कार्यक्रम शनिवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत आयोजित केला जातो. याचा जिल्ह्यातील जनतेने लाभ घ्यावा.
जिल्हा पोलिस विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जर पोलिस तुमच्या अखत्यारीतील पोलिस स्टेशनमध्ये समस्यांबाबत तक्रार नोंदवत नसतील, तुम्ही दिलेल्या अर्जाची चौकशी होत नसेल, तर अवैध दारू विक्री, चोरांसह इतर प्रकरणांसंदर्भात जनता जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार हॉटलाइनवर कॉल करू शकता.नागरिकांनी 0831-2405226 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.