‘साराभाई वर्सेस साराभाई 2 मध्ये काम केलेल्या अभिनेत्रीच अपघातात निधन
‘साराभाई वर्सेस साराभाई 2’ या शोमध्ये जॅस्मीन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती. चंदिगडमध्ये असलेले तिचे कुटुंबीय मृतदेह मुंबईत आणत आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.