बेळगांव ता,5.अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात आला.प्रारंभी संत मीरा विद्या केंद्र मालापुर मुधोळ शाळेचे मुख्याध्यापक उदय वाळवेकर व उषा वाळवेकर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,विना जोशी किरण पावसकर क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील चंद्रकांत तुर्केवाडी ,मयुरी पिंगट, यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात फणस व आंबा रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना प्लास्टिक बंदी विरोधी घोषणा देत कापडी पिशव्यांचा वापर करावा हा संदेश देण्यात आला मुख्याध्यापिका सुजाता दत्तदारीने पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून दिले व झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला याप्रसंगी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विना जोशी तर किरण पावसकर यांनी आभार मानले.