बेळगाव ता,26 माळमारुती येथील स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर संतमीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती राज्यस्तरीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा अनगोळ तिहेरी मुकूट व शांतिनिकेतन पदवीपूर्व कॉलेज खानापूर बेळगांव व आरव्हीके स्कूल बेंगलोर यांनीही विजेतेपद पटकाविले.
प्राथमिक मुलांच्या 14 वर्षाखालील गटातील अंतिम लढतीत आरव्हीके स्कूल बेंगळूर शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर बेळगांवचा 2-0 असा पराभव केला,
विजयी संघाच्या गौरव व अभिनव आणि प्रत्येकी एक गोल केला तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा इंग्रजी स्कूल अनगोळने आरव्हीके बेंगळूर संघाचा 2-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या प्रीती कडोलकर श्रेया लाटुकर यांनी प्रत्येकी 1 गोल केला.17 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळने शारदा विद्यालय मंगळूरचा 2–0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या अब्दुल मुल्ला, फैजान धामणेकर यांनी प्रत्येकी एक गोल केले.मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूलने शारदा विद्यालय मंगळूरने 2–0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या दिपीका रेंग, श्रद्धा तिप्पण्णावार यांनी प्रत्येकी 1 गोल गोल. 19 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात शांतिनिकेतन पदवीपूर्व कॉलेज खानापूरने पुत्तुर मंगळूर कॉलेजचा पेनाल्टी शूटआउटवर 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले, विजयी संघाच्या आदित्यने एकमेव गोल केला.
वरील विजेते सर्व संघ 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान कुरुक्षेत्र हरियाणा येथे होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे विद्याभारती राज्य संघटन कार्यदर्शी उमेश कुमार जी, संतमीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव,विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट. चंद्रकांत तुर्केवाडी, शामल दड्डीकर, अमृता पेटकर, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र ,पदक देऊन गौरविण्यात आले, या स्पर्धेसाठी पंच म्हणून मानस नायक ,कृष्णा मुचंडी, आदित्य सानी, प्रणव देसाई, स्वयम ताशिलदार, यश पाटील शिवकुमार सुतार, श्रेयस खांडेकर ,सोहेल बिजापुरे ओमकार गावडे ,सागर कोलेकर, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामल दड्डीकर यांनी तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले, शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.