विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद.
बेळगाव तारीख 20 बैतूनी इटारसी मध्य प्रदेश येथील भारत भारतीय आवास विद्यालय शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या 33व्या विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने विजेतेपद पटकाविले.
प्राथमिक गटातील मुलींच्या पहिल्या सामन्यात संत मीरा शाळेने मध्यक्षेत्राचा 5-3 असा पराभव केला विजयी संघाच्या समीक्षा बुद्रुकने 3 गोल, ऐश्वर्या पत्तारने 2 गोल केले.
दुसऱ्या सामन्यात दक्षिणमध्य क्षेत्रने पश्चिम उत्तर क्षेत्राचा 3-2 असा पराभव केला विजयी संघाच्या समीक्षा बुद्रुकने 2 गोल, मेघा कलखांबकरने 1 गोल केला अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने उत्तर क्षेत्राचा 4-2 असा पराभव करीत विजय संपादन केला.विजयी संघाच्या समीक्षा बुद्रुकने 2 गोल, ऐश्वर्या पत्तारने व वर्षा परिटने प्रत्येकी 1 गोल केला.
आता आगामी होणाऱ्या स्कूल गेम्स ऑफ फेडरेशनच्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा हँडबॉल संघ पात्र ठरला आहे.
विजेत्या संघात कर्णधार समीक्षा बुद्रुक, ऐश्वर्या पत्तार, वर्षा परिट,दिशा जोशी, प्रणिता मजुकर, स्नेहा धनवडे , भावना कौजलगी,साक्षी पाटील, श्रुती कुंभार, सृष्टी तडकोड, सोनाक्षी देसाई, मेघा कलखांबकर, खेळाडूंचा समावेश आहे या संघाला प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, सुशांत मलतवाडी, सुमित सौंदत्ती यांचे संघाला मार्गदर्शन लाभत आहे. तर शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे ,प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी ,शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट निरंज सावंत ,गौतम तेजम यांचे प्रोत्साहन लाभत आहे.