संस्कार हे शिक्षणापेक्षा श्रेष्ठ असते -डॉ.बी.जी. कुलकर्णी
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालया तर्फे हालभावी उक्कुड या गावी आयोजित राष्ट्रीय सेवा योजना चे सात दिवशी शिबिराचे उद्घाटन मराठा मंडळ अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.जी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाल्यानंतर एन.एस.एस. अधिकारी प्रा. राजू हट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नंतर प्राचार्य डाँ.बी.जी. कुलकर्णी यांनी शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी उद्घाटक आणि प्रमुख अतिथीच्या नात्याने बोलताना
डॉ. बी.जी कुलकर्णी म्हणाले की, आजच्या आधुनिक युगामध्ये जगामध्ये अनेक क्रांतिकारी बदल घडत आहेत, पण संस्काराच्या अभावामुळे सामाजिक बांधिलकी मध्ये कमतरता जाणवत आहे. म्हणून संस्कार हे शिक्षणा पेक्षा श्रेष्ठ आहे. संस्कार हे शिक्षण,शिस्त आणि सामाजिक बांधिलकीला जोडणारा दोरा आहे.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर म्हणाले की, एन.एस.एस.मुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वाव मिळुन समाजसेवेची भावना त्याच्यात निर्माण होते. दुसऱ्यांची निष्ठेने केलेली सेवाच मनुष्याला सर्वात जास्त समाधानी ठेवते.
या शिबिरामध्ये जनावरे तपासनी, दात, नेत्र आणि स्वास्थ्य तपासनी सारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत तर अनेक सामाजिक आणि जनजागृती विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला डॉ. डी.एम. मुल्ला, डॉ. एच.जे.मोळेराखी,प्रा.सुरेखा कामुले,प्रा.शिल्पा मुदगोप्पगोळ, डॉ. वृषाली कदम आणि अनेक एन.एस.एस. स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.वृषाली कदम यांनी वंदनार्पण केले.