नवी दिल्ली :
देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात प्रतिष्ठेच्या पदावर म्हणजेच उपराष्ट्रपतीपदी निवड झालेल्या सी.पी. राधाकृष्णन यांना बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.
१६व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेल्या राधाकृष्णन यांनी १९७४ साली जनसंघाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून सक्रिय राजकारणात पाऊल टाकले. ते दोनवेळा कोयंबतूरचे खासदार राहिले असून, भाजपच्या तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. तसेच जारखंड व महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.
आता उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी स्वीकारत असताना त्यांच्या अनुभवी नेतृत्वामुळे लोकसभेचे कामकाज अधिक सुगम व विधायक पद्धतीने पार पडेल, असा विश्वास माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केला.