सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे.सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांना ,आमदारांना एकत्र घेऊन आवश्यक ते प्रयत्न करणार आहे.महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटून वकिलांची नेमणूक करणे वगैरे बाबींची पूर्तता करणार आहे असे उदगार चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी काढले.
कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करताना ते बोलत होते. सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी मी प्रयत्नशील आहे.सीमाप्रश्न दाव्याच्या पुरावा आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
१ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा स्मारक येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे,बेळगाव,कारवार,निपाणी बीदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर ,माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील ,रमाकांत कोंडूस्कर,आर.एम.चौगुले
यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.