कंग्राळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव सह सीमाभाग हा तत्कालीन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आल्यानंतर बेळगावात मोठ्या विरोधात आंदोलन झालं .या आंदोलनना वेळी 17 जानेवारी 1956 रोजी चार आणि दुसऱ्या दिवशी एक अशा पाच हुतात्मा पोलिसांच्या गोळीबाळाला बळी पडावं लागलं त्यामुळे हुतात्म्यांना आज अभिवादन करण्यात आले.
कंग्राळी खुर्द येथील सीमा लढ्यात हुतात्मा झालेल्या मारुती बेंन्नाळकर यांना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रारंभी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार माजी महापौर शिवाजी सुंडकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
https://www.facebook.com/DMEDIA24/videos/1628620214323094/?mibextid=8Amip7
त्यानंतर मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार मनोहर किनयेकर माजी महापौर शिवाजी सुंठकर,कृष्णा हुंदरे,वकील सुधीर चव्हाण, शिवसेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश शिरोळकर,भाऊ पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील , राकेश धामणेकर, एम आर चौगुले, निगाप्पा जाधव, नीलिमा पावशे, पौर्णिमा पाटील, सरस्वती पाटिल, अर्चना हलगुंडी, जोती पाटिल, रुक्मिणी नीलजकर , प्रसाद पाटिल उपस्थित होते .