सलाम त्या 500 महरा शूरवीरना
भीमा कोरेगाव विजय उत्सव दिनानिमित्त शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी किल्ला तलाव येथून या भीमा कोरेगाव विजयोत्सव दिनाच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी केला तलाव येथील महार रेजिमेंट येथून या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर क्रांतिवीर संगोळी रायण्णा चौक राणी चनामा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पर्यंत आंबेडकर चळवळीतील नेते आणि सदस्यांनी रॅली काढली.
यावेळी या विजय ज्योती रॅलीचे स्वागत करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर 500 शूरवीर महा शिपायांना वीर सलामी देण्यात आली.
प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित असलेले केळी मंत्र्यांशी यांनी भीमा कोरेगावचा इतिहास सांगितला त्यानंतर या ठिकाणी झालेल्या शौर्यगाथाबद्दल सर्वांना माहिती दिली. त्यानंतर पालिका आयुक्त भाग्यश्री हुगी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या योगदानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाला रमेश धामणनावर विधावती लोकळे के डी मंत्रेशी सरकार नोकर संघाचे राजाध्यक्ष व बसवराज रायगोड यलाप्पा सम्राट मल्लेश चौगुले मलेश कुरंगी सिद्धाप्पा कांबळे श्रीरंग जोशी सुधीर चौगुले शंकर कांबळे यांच्यासह आंबेडकर चळवळीतील नेते उपस्थित होते.