पायाने अधू असलेल्या युवकाला सीमावासियांचा सलाम
_*कंग्राळी खुर्द मध्ये हुतात्म्यांना अभिवादन*_
कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात आंदोलन करत असलेल्या आंदोलकावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये सीमा भागातील अनेक शूरवीरांनी हुतात्म्य पत्करलं होतं यापैकीच एक कंग्राळी खुर्द गावातील मारुती बेन्नाळकर यांनी सुद्धा हुतात्म्य पत्करलं होत.या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ सीमा भागात १७ जानेवारी हुतात्मा दिन म्हणून कडकडीत हरताळ केला जातो. त्यानिमित्ताने आज कंग्राळी खुर्द गावामध्ये हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सीमा प्रश्नासाठी असलेल्या निष्ठे-पायी पाय फ्रॅक्चर असून सुद्धा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील हे उपस्थित होते. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील व भाऊ पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.