बेळगांव:सिमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले.१७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या सीमा आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बेळगाव आणि निपाणी येथे आंदोलकांनी हौतात्म्य पत्करले. सिमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दोन मिनिटे मौन पाळून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मुक फेरी काढण्यात आली.
मुक फेरीत मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मुक फेरीची सांगता झाल्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.हुतात्मा चौक येथील अभिवादन कार्यक्रम झाल्यावर कंग्राळी , हिंडलगा येथे देखील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.