ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत साईश्वरीला कांस्यपदक
बेळगावच्या तरुण जुडो खेळाडू साईश्वरीने उत्तराखंडमधील देहरादून येथे २८ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान आयोजित केलेल्या ज्युनियर राष्ट्रीय जुडो स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत ७८ किलो वजनाच्या गटात कांस्यपदक पटकावले. ही स्पर्धा कुमारी साईश्वरीसाठी एक महत्त्वाची यशोगाथा ठरली आहे.
गेल्या वर्षी साईश्वरीने कझाकस्तान व चीन येथे पार पडलेल्या आशिया ओपन जुडो स्पर्धेत भारताचे दुहेरी प्रतिनिधित्व केले होते. याशिवाय, २०२३ मध्ये केरळमध्ये झालेल्या साउथ झोन महिला राष्ट्रीय लीगमध्ये रौप्यपदक आणि बेळ्लारी, कर्नाटक येथील कॅडेट जुडो स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते. https://dmedia24.com/singer-and-music-teacher-vinayak-more-family-of-kakade-foundation-on-behalf-of-the-foundation/
साईश्वरीच्या या यशामागील प्रमुख सूत्रधार म्हणजे तिचे प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी हे आहेत.बेळगाव जिल्हा स्टेडियममध्ये ती यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते. जिल्हा क्रीडा उपसंचालक श्रीनिवास बी. यांनीही तिच्या प्रशिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले आहे.
साईश्वरीच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे भारतीय जुडोमध्ये तिचे नाव लौकिक झाले आहे.तिच्या प्रशिक्षकांनी तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाला श्रेय दिले आहे. “तिची धडपड आणि महत्त्वाकांक्षा तिला ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांपर्यंत नेईल,” असे मतं जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.