संत मीरा बालिका आदर्श, लिटल स्कॉलर, सेंटपॉल सेंट झेवियर्स ,अंतिम फेरीत.
बेळगाव ता,1. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, लिटल स्कॉलर, सेंटपॉल बालिका आदर्श सेंट झेवियर्स शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्राथमिक मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात लिटल स्कॉलर संघाने सेंट झेवियर्स शाळेचा 2-1असा पराभव केला, दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने गोमटेश शाळेचा 4-1 असा
पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंटपॉल शाळेने भरतेश शाळेचा 3-0 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत शाळेने बी टी देसाई शाळेचा 4–0 पराभव केला.
माध्यमिक मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने भरतेश शाळेचा 3-0असा तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बालिका आदर्श शाळेने महातेशनगर विभागाचा 6–0 पराभव केला.
माध्यमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने भरतेश शाळेचा 5-0 पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत शाळेने लिटल स्कॉलर संघाचा 6–0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
तत्पूर्वी सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे क्रीडाभारती राज्यसचिव अशोक शिंत्रे अनगोळ क्लस्टरचे सीआरपी श्रीनिवास सोनटक्की, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार ,संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील स्पर्धा सचिव चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख व नाणेफेक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी उमेश बेळगुंदकर, चेस्टर रोजारियो, जयसिंग धनाजी, ज्युलेट फर्नांडिस, उमेश मजुकर ,शिवकुमार सुतार, देवेंद्र कुडची ,मारुती मगदूम, संजय केळगिरे, अनिल जनगौडा, महावीर जनगौडा शिला सानिकोप, रामलिंग परीट, यश पाटील ,आदी उपस्थित होते.