*स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या तरुणांनी राष्ट्रासाठी त्याग करायला हवा.. सागर श्रीखंडे*
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त बुधलमुख पांगीर येथे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणी हिंदू हेल्प लाईन निपाणी यांच्या वतीने सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंदू हेल्प लाईन निपाणी चे प्रमुख सागर श्रीखंडे यांना सावरकर यांच्या विषयी सांगते वेळी म्हणाले की
आपल्या राष्ट्रासाठी सर्वस्वाची होळी करूनही सर्वाधिक उपेक्षा वाट्याला आलेला महानायक म्हणजे- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. इतिहास हा कायमच सत्तापक्षाच्या नजरेने सांगितला आणि शिकवला गेला आहे. त्या इतिहासाच्या अन्यायाला गाडून पुन्हा नव्याने आपल्या विचारांचं गारूड उभा करणारा लढवय्या म्हणजे सावरकर. थोर राष्ट्रभक्त, क्रांतिकारक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक, साहित्यिक, राजकारणी, कवी, इतिहासकार,नाटककार, मेधावी वक्ता. कितीतरी तेजस्वी पैलू. एकेका पैलूवर जीव ओवाळून टाकावा इतके महान होते क्रांतिकारक सावरकर सर्वांना माहित आहे, पण क्रांतिप्रेरक सावरकर उपेक्षित आहे. स्वत: हातात तलवार घेवून शौर्य गाजवणं सोपं असतं पण आपल्या तोडीचा योध्दा जन्माला घालणं कठीण असतं. छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव यांच्यानंतर हे कार्य वास्तविक अर्थाने सावरकरांनी यश्स्वीपणे केलं.
अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा, कर्वे, देशपांडे अशी राष्ट्रमाऊलीच्या चरणी आपलं मस्तकं अर्पण करणारी क्रांतिकारक फळी सावरकरांनी उभी केली. रत्नागिरीत असताना त्यांनी समाज सुधारणेचं जे काम केलं त्याला तोड नाही. त्यांच्या याच कार्याने प्रभावित होऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असं म्हणाले होते की, माझ्या वाट्याचं आयुष्य ईश्वराने सावरकरांना द्यावं.अस्पृश्यांसाठी त्यांनी पतित पावन मंदिराची उभरणी केली हे सर्वज्ञात आहेच. अस्पृश्यांच्या वस्तीत भजन करणे, सामूहिक भोजनाचे कार्यक्रम आयोजित करणे, सामूहिक हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करणे, अस्पृश्यांच्या मुलांना शाळेत एकत्र बसवणे असे अनेक कार्यक्रम सावरकरांनी राबवले.
त्यांनी सुमारे ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. सामाजिक कार्यक्रम, नाटके, सभा, सत्यनारायण अशा सर्व कार्यक्रमात सवर्णांसेबात अस्पृश्य असतील याची कायम दक्षता त्यांनी घेतली. जातिव्यवस्था उखडून टाकण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह लावले. त्यासाठी सवर्णांच्या विरोधाला त्यांनी जुमानले नाही.
तर ते एक कृतिशील समाजक्रांतिकारक होते.’
देशातील तरुणाई ने त्यांच्या जयंती निमित्त देहा कडून देवाकडे जातांना मधी देश लागतो आणी आपण त्या देशाचे देणे लागतो हा संदेश आपल्या जीवनांत आचरणात आणावा असे आव्हान हिंदू हेल्प लाईन चे सागर श्रीखंडे यांनी यावेळी केले.
यावेळी सूरज शिंदे,सतीश मोरे, गुरुनाथ गुरव, सागर गुरव, दिगंबर मोरे, रुशिकेश गुरव, विष्णू चव्हाण, उदय चव्हाण, कुणाल पोटले, कार्तिक शिंदे, कुणाला शिंदे सह पांगीर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.