*सद्गुरु तायक्वांदो अकॅडमी चे घवघवीत यश*.
नुकत्याच पार पडलेल्या बेंगलोर येथे सातवी कर्नाटका तायक्वांदो कप स्पर्धा पार पडल्या या स्पर्धा फाईट, पूमसे, टॅग फाईट ,अशा स्वरूपात आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये 6 वर्षे आतील, 8 वर्षे आतील, 10 वर्षे आतील,14 वर्षे आतील व 14 वर्षे वरील वयोगट आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातून निपाणी येथून सद्गुरु अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये अर्जुन वाळवे, विश्वजीत पटनशेट्टी, पोर्णिमा परीट, दिया तीप्पे, रोही बोलले, अरोही बोधले, श्रीविराज मोहिते, अर्णव बोरगावे, वरद पठाडे, सार्थक निर्मले, अभिषेक उपाळे, श्लोक लिगाडे ,सोनल लिगाडे, तनया वाळवे, आकाशी हिरेकोडी, सौम्या खोत, समयरा पठाण, लावण्या सावंत, पूर्वा साळुंखे ,अवनी व्हदडी , सानिध्य भीवसे , समर्थ निर्मले, यांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन सुवर्णपदक , रौप्य पदक व कांस्यपदक पटकावून, एकूण अकॅडमी ला 16 सुवर्णपदक, 18 रौप्य पदक, तर 8 कास्यपदक पटकावून पदकांची लय लुट केली व बेळगाव जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक बबन निर्मले, सहप्रशिक्षक देवदत्त मल्लाडे यांचे मार्गदर्शन लाभले तर डॉ. विवेक सोलापूरकर ,चिंतामणी वाळवे, गणेश पठटणशेट्टी, संदीप मोहिते, संतोष लिगाडे, सचिन सावंत अनंत बोरगाव यांची प्रोत्साहन मिळाले यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.