धावत्या कारला आग ……..!!!!!
कोल्हापूर सर्कल येथे सिग्नलवर थांबलेल्या कारला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली आहे. आज सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास कारला आग लागल्याने कार मधील सर्व साहित्य आणि कार संपूर्ण जळून बेची राख झाली आहे.
ही कार गोवा येथील असून कारमालक जॉन सिल्वा आणि स्टेव्हलना सिल्वा हे दोघेजण कार क्रमांक GA 08 7590 या कार मध्ये होते. फोर्ट रोड वरून केएफसी ला जात असताना कोल्हापूर सर्कल येथे सिग्नल वर आल्यावर शॉर्टसर्किटने त्यांच्या गाडीने पेट घेतला.
हे दोघेही दांपत्य गोवा येथून बेळगावला फोर्ट रोड येथे ट्रक टेम्पो यासह अन्य गाड्यांचे सामान आणण्याकरता आले होते. तसेच त्यांनी फोर्ट रोड वरती आपल्या गाडीचा बल्ब देखील आजच बदलला होता. त्यामुळे शॉर्ट सर्किटने आग लागली असावी असा अंदाज हे दांपत्य व्यक्त करत आहेत .
या घटनेत कार संपूर्ण जळून खाक झाले असून गाडीमध्ये असलेले सर्वसामान देखील जळून खाक झाले आहे.यावेळी घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळून आग आटोक्यात आणली. यावेळी घटनास्थळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती.