*अलतगे येथे 20 लाख रुपयांच्या गटार कामाला हिरवा कंदील*
कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत हद्दीतील अलतगा गावात पंचायतीतील 15 वा वित्त आयोग व आमदार सतीश जारकीहोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने जवळ पास 20 लाख रुपयांच्या निधीतून गटार कामाला के पी सी सी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
येत्या 25 एप्रिल रोजी होणाऱ्या ऐतिहासिक 75 वर्षानंतर होणाऱ्या लक्ष्मी यात्रेसाठी मूलभूत सुविधांचा अभाव होणार नाही म्हणून आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्टोक्ती दिली होती, त्याप्रमाणे कामे झाल्याने जनते कडून समाधान व्यक्त होत आहे.
गावामधील मारुती बाळू पाटील यांच्या घरापासून म्हारकी होळ 12 लाख रुपये, व ब्रह्मलिंग देवस्थान पासून मार्कंडेय नदी 10 लाख रुपये 3 फूट रुंदीचे पाईप लाइन असे कामांना चालना देण्यात आली . येत्या काळात अलतगे गावामधील आंतरिक रस्त्यांसाठी जवळपास 50 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मलगौडा पाटील यांनी दिले .
यावेळी ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, विनोद शिंदे, गिरीजा सुतार, एस डी एम सी चेरमन पिंटू जाधव, सदस्य बाळू पोटे, महादेव घुग्रेटकर, परशराम चिक्कलकर, परशराम पाटील, मोहन पाटील, पितांबर पाटील, बंडू चौगुले, राहुल पाटील, मारुती पाटील, मधू पाटील कंत्राटदार महेश पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडूम होते तर सेक्रेटरी कल्लाप्पा (पिंटू) चौगुले यांनी आभार मानले.