बेळगांव:सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कार ज्याठिकाणी होत असतो.त्या ठिकाणचे छत संपुर्ण खराब झाले होते. अंतिम संस्कार करण्यास लोकांना अडचणी निर्माण होत असून छताची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याचे आश्वासन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ राजू शेठ यांनी स्मशानभूमी समितीला दिले होते.
या आश्वासनाची पूर्तता करण्याकरिता आमदार राजू शेठ यांचे चिरंजीव अमन शेठ यांनी शुक्रवारी सदाशिव नगर स्मशानभूमीला महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. स्मशानभूमी मधील छत दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन करुन कामाला शुभारंभ केला. तसेच महानगरपालिका अधिकाऱ्यांना व कंत्राट दलाला हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आदेश यावेळी त्यांनी दिले.