जॅमरची तीव्रता कमी करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको
हिंडलगा कारागृहात बसवण्यात आलेल्या जॅमरची तीव्रता कमी करावी या मागणीसाठी हिंडलगा आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी जेलसमोर रास्ता रोको करून बेळगाव वेंगुर्ला मार्गांवरील वाहतूक रोखून धरली.https://dmedia24.com/cantonment-board-primary-primary-school-enthusiasm-marathi-language-day/
जेलमध्ये असणाऱ्या कैद्याच्या मोबाईलला नेटवर्क मिळू नये म्हणून फाईव्ह जी जॅमर जेलमध्ये बसवण्यात आला आहे. यामुळे त्या परिसरातील मोबाईल नेटवर्क ठप्प होऊन त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. यापूर्वी देखील जेलमध्ये बसवलेल्या जॅम रची तीव्रता कमी करावी म्हणून जेल अधीक्षकांना निवेदन ग्रामस्थानी दिले होते. पण त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही.
मोबाईल नेटवर्क नसल्याने सगळ्या संबंधित सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थानी जेलसमोर रास्ता रोको करून बेळगाव वेंगुर्ला मार्गांवरील वाहतूक रोखून धरली. अखेर जेल अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. वरिष्ठाशी बोलून यावर योग्य तो निर्णय घेऊन जनतेची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. रास्ता रोकोमुळे बेळगाव वेंगुर्ला मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.