बेळगाव: तालुक्यातील व कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील गौंडवाड गावामध्ये अनेक वर्षांपासून रस्त्याची मोठी समस्या होती येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्ता संपूर्णपणे खराब झाल्या असल्याकारणाने नागरिकांना तिथून इजा करण्यास अडचणींचा सामना करावा लागत होता. याकरिता अनेकदा गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत तिला निवेदन दिले होते. त्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी खासदार प्रियंका जारकीहोळी यांना सांगितले असता.https://dmedia24.com/the-relatives-of-the-deceased-were-taken-to-the-relatives-and-consoled/
तातडीने खासदार निधीतून प्रियांका जारकीहोळी यांनी हा रस्ता मंजूर केला.व शनिवारी रस्त्याच्या विकास कामाचे खासदारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना खासदार म्हणाले की वडिलांनी याआधी गावांमध्ये खूप विकासकामे केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय अनुदानातून हा रस्ता मंजूर करून आज या कामाला शुभारंभ करण्यात आला आहे. योग्यरीत्या व गुणवत्तेचे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे अक्त सहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील,कंग्राळी ग्रामपंचायत पीडीएफ, ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.