पंतप्रधान च्या सभेमध्ये हॅन्डबॅग व इलेक्ट्रिक उपकरण पाण्याच्या बाटलीवर निर्बंध
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव भेटीवर येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या उद्घाटनाचे कार्य संपन्न होणार असून त्यानंतर त्यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली आहे.
या त्यांच्या जाहीर सभेत हॅन्ड बॅग, इलेक्ट्रॉनिक्स उपकरण पाण्याच्या बाटल्यांवर निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज प्रसिद्ध पत्रकार दिली आहे.
नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून हे निर्बंध घालण्यात आले असून नागरिकांना सभेच्या ठिकाणी पाणी पुरवण्यात येईल असे देखील प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
तसेच या सभेत सर्वजण आपला मोबाईल फोन घेऊन जाऊ शकतात असे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.