सीमाभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वैद्यकीय शिबिराला प्रतिसाद
शिवसेना सीमाभागात गेली अनेक वर्षे वैद्यकीय शिबीरांचे आयोजन करते, यावर्षीही दिडशेहुन अधिक शिबिरे सीमाभागात राबविण्यात येत आहेत, बेळगाव,बेळगाव तालुका,खानापूर तालुक्यासह इतर भागात या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, या शिबारामध्ये डोळे तपासणी करून गरज भासल्यास चष्म्यानच वितरण केले जाते, या शिबिराला मन्नूर,बैलूरसह इतर भागात भरघोस प्रतिसाद मिळाला, आज एक मार्च रोजी विजयनगर हिंडलगा भागात या शिबिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याचे उदघाटन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके,कार्याध्यक्ष धनंजय पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते करण्यात आले, दिवसभर या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला या मध्ये या भागातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी बाडीवाले त्यांचा परिवार व परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग दर्शविला.
हा शिबिराचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पीयूष हावळ यांनी विशेष परिश्रम घेतले.