This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*’ऑपरेशन मदत’ संस्थेच्या हाकेला प्रतिसाद*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*’ऑपरेशन मदत’ संस्थेच्या हाकेला प्रतिसाद*

 

‘ऑपरेशन मदत’ संस्थेच्या हाकेला प्रतिसाद देऊन पोलिस (DCP Shekhar TH) विभागाने वाळू पसरलेला राज्य महामार्ग स्वच्छ करून अपघात टाळले –

आज सकाळी शगुन गार्डन हाॅल जवळील खादरवाडी क्राॅस येथे उद्यमबाग रस्त्यावर वाळूच्या वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून वाळू पडली होती. ती वाहनांच्या वर्दळीने रस्ताभर पसरली होती. या पसरलेल्या वाळूमुळे दुचाकी वाहनांना व सायकल स्वारांना अपघात होऊन पडण्याचा धोका निर्माण झाला होता. सदर बाब तेथून जाताना ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या एका कार्यकर्त्याच्या

नजरेस आली. त्यांनी प्रथम थोड्या अंतरावरील ट्रॅफिक पोलिसांना ही बातमी दिली, तसेच बेळगांव शहराच्या पोलिस विभागाचा नव्यानेच चार्ज घेतलेल्या DCP शेखर टी एच यांना फोनद्वारे दिली. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देताना DCP सरांनी ताबडतोब उद्यमबाग पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन समस्येचं निराकरण करण्यास सांगितले, त्याप्रमाणे उद्यमबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक व इतर अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट दिली, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन सदर परिसर स्वच्छ करून वाहतूकीला मोकळा करण्यात आला. सामान्य जनतेच्या प्रश्नांना मदत करणाऱ्या पोलिस विभागाच्या व महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना खरोखरच एक सलाम !

या मार्गावरून परिसरातील शाळा-काॅलेजीसचे विद्यार्थ्यी, उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी, आजुबाजूच्या गावातील लोकांची तसेच गोवा-मुंबई राज्य महामार्ग असल्याने रहदारी भरपूर असते, परिणामी पोलिस विभागाने तत्परतेने वाळू पसरलेला राज्य महामार्ग साफ केल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now