” कलाश्री ” च्या पंधराव्या लकी ड्रॉ योजनेच्या मानकरी ठरल्या रुक्मिणीनगरच्या रेश्मा शहापूरकर : मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली रेनॉल्ट क्विड वाहनाची चावी
बेळगाव, दिनांक 1 (प्रतिनिधी) : कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरच्या पंधराव्या लकी ड्रॉ च्या मानकरी रुक्मिणीनगर बेळगाव येथील सौ. रेश्मा शहापूरकर या ठरल्या. या भाग्यवान विजेत्यांना कलाश्री च्यावतीने रेनॉल्ट क्विड ही चार चाकी गाडी बक्षीसाखातर देण्यात आली. कलाश्री ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश डोळेकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोडतीच्या भाग्यवान विजेत्या रेश्मा शहापूरकर यांच्या पतीकडे गाडीची चावी सुपूर्द करण्यात आली
कलाश्रीच्या 15 व्या भाग्यवान सोडत कार्यकमाला प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव महापालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे, स्वरूप नर्तकी सिनेमागृहाचे संचालक अविनाश पोतदार, भारतीय आयुर्विमा महामंडळ विकासाधिकारी परशराम घाडी, नगरसेवक रमेश मैल्यागोळ, सामाजिक कार्यकर्ते किशोर काकडे, जय भारत सोसायटीचे चेअरमन बी.आय. नेसरकर, बँक ऑफ महाराष्ट्र टिळकवाडी शाखेचे व्यवस्थापक सायमन मस्करेन्हस ,उदयोन्मुख पैलवान अतुल शिरोळे, सामाजिक कार्यकर्त्या मालती सक्सेना उपस्थित होत्या.
कलाश्री ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश डोळेकर यांनी प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच मान्यवरांना भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला.
कलाश्री निर्मीत ” थ्री इन वन या सोलार ” या सौरऊर्जा, वीज आणि जळण यावर पाणी तापविणाऱ्या सिस्टीमचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले .
यावेळी बोलताना महापौर शोभा सोमनाचे यांनी, कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरच्या सेवाभावी व्यवसायाची प्रशंसा केली. कलाश्रीने आपल्या कार्यकर्तृत्वाने विश्वासार्हता जपली असल्याचे त्या म्हणाल्या.
आर्थिक दुर्बल घटकालाही किमती वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी कलाश्रीने हप्तेरूपाने आणि लकी ड्रॉ स्वरूपात ग्राहकांना वस्तू पुरविण्याचा जो उद्दत व्यवसाय सुरू केला आहे तो गौरवास्पद आहे, असे अविनाश पोतदार म्हणाले.
नगरसेवक रमेश मैल्यागोळ यांनी, कलाश्रीच्या व्यवसायाला सेवाभावाचा स्पर्श आहे. यामुळेच त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असल्याचे म्हटले.
यावेळी अन्य मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली. कलाश्री उद्योग समुहाने वर्षानुवर्षे आपली विश्वासार्हता आणि उत्पादनातील गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. तसेच प्रगती साधताना सामाजिक बांधिलकीही जपली आहे,हे प्रशंसनीय असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात म्हटले.
या भव्यदिव्य कार्यक्रमाचे औचित्य साधून कार्यक्रमास दुपारी चार ते साडेचार या दरम्यान कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणाऱ्या ग्राहक आणि हितचिंतकांसाठी 11 लकी ड्रॉ काढण्यात आले होते. या ड्रॉ चे भाग्यवान मानकरी ठरलेल्या संतोष वरगे (केदनुर), सौ. विद्या पाटील (नेहरू नगर), सौ. प्रियंका नाकाडी (बिडी), सौ.विठ्ठल सांबरेकर (अनगोळ), नागप्पा कोंडुस्कर, (बसरीकट्टी) सौ. रेश्मा मासेकर (हिंदवाडी), पूजा मांडेकर (शिंदोळी ), बसवराज तोटड, पी. वाय. लोहार (राजाराम नगर), सौ. रेणुका खेमनालकर (कर्ले) यांचा पाहुण्याच्या हस्ते भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कलाश्री जनरल स्टोअर्स मध्ये एक हजार रुपयांवर किराणा खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी यावेळी लकी कूपनची सोडत काढण्यात आली. त्यामधील पाच भाग्यवान विजेत्या पांडुरंग पाटील, आप्पया डोळेकर, आनंद जी पाटील, एस.के. मिर्जे व आनंद हिरेमठ यांना अनुक्रमे 5001, 2501 , 2001 , 15O1, व 1001 रुपयांचे व्होचर्स देऊन देऊन सन्मानीत करण्यात आले.
शेवटी अविनाश पोतदार यांच्या हस्ते सर्व ग्राहकांसमोर 15 व्या भाग्यवान विजेत्याची चिठ्ठी काढण्यात आली आणि अविनाश पोतदार यांनी या मेगा बक्षीसाच्या मानकऱ्याचे नाव जाहीर केले. रुक्मिणीनगर बेळगाव येथील सौ. रेश्मा शहापूरकर ह्या 15 व्या सोडतीच्या मानकरी ठरल्या. रेश्मा शहापूरकर यांच्या पतीकडे चारचाकी गाडीची चावी सुपूर्द करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी.डी पाटील यांनी केले तर कलाश्री समूहाच्या संचालिका सुकन्या डोळेकर यांनी आभार मानले .