अलतगा ग्रामस्थांच्या वतीने महालक्ष्मी यात्रेच्या परवान्यासाठी निवेदन.
बेळगाव: येत्या एप्रिल 25 रोजी अलतगा येथे तब्बल 75 वर्षानंतर ऐतिहासिक श्री महालक्ष्मी यात्रेच्या परवान्यासाठी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना के पि सी सी सदस्य मलगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. त्याच बरोबर अलतगा गावचे आंतरिक रस्ते, पाणी, विद्युत, पोलीस सहकार्य व मूलभूत समस्या असतील ते सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन यमकानमर्डी चे आमदार यांच्या वतीने मलगौडा पाटील यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ नितीश पाटील , पोलीस आयुक्त श्री बोरलिंगय्या , धर्मादायी व मुजराई इलाखा आयुक्त, तहसीलदार, सी पि आय काकती, हेस्कॉम ग्रामीण अधिकारी प्रवीण कुमार चिकार्डे, हेस्कॉम सेक्शन ऑफिसर हिंडलगा श्री शिंगे या सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, देवस्थान कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, सदस्य गणपत सुतार, पिराजी पावशे, मानव बंधुत्व वेदिकेचे अध्यक्ष विजय तळवार आदी उपस्थित होते.