रेखा इंडिकर यांना सीरिगन्नड रत्न पुरस्काराने सन्मानित
बेळगाव: कन्नड साहित्य भवन येथे कर्नाटक राज्य बरहगार संघ जिल्हा घटक व बेळगाव जिल्हा घटक सिरीगन्नड वेदिके आणि बेळगाव जिल्हा लेखकी संघ यांच्या वतीने सीरीगन्नड रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कंग्राळी बुद्रुक गावच्या ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या रेखा इंडिकर यांना सीरीगन्नड रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांनी सामाजिक सेवा,शिक्षण व कन्नड भाषेसाठी उत्तम कामगिरी केल्याने हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्या अनेकां पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.