This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रिल स्टार मानसी पाटीलचा गोजगे येथे सत्कार*

*रिल स्टार मानसी पाटीलचा गोजगे येथे सत्कार*

बेळगाव – (प्रतिनिधी) : बेळगावची उदयोन्मुख रिल स्टार मानसी पाटील हिचा गोजगे येथे श्री शिवस्मारक युवा संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. नवरात्रोत्सवात महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात जागृती करणाऱ्या तिच्या सामाजिक संदेशपर रिल्समुळे बेळगावची मुलगी म्हणून ती चर्चेत आली आहे.

दुर्गामातेच्या सशक्तीकरण संकल्पनेवर आधारित तिच्या या रिल्समधून समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याचा आणि महिला सशक्तीकरणाचा प्रभावी संदेश दिला गेला.

ग्रामपंचायत सदस्या रेणूका युवराज प्रभावळकर यांच्या हस्ते मानसीचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्याबद्दल तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती समाजासाठी सकारात्मक संदेश पोचवण्याचे कार्य करत आहे.

कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष कुमार बसवंत पावशे , उपाध्यध्य कलिंदर होनगेकर , निलेश बेळगावकर , योगेश चलवेटकर ,किशोर मजूकर , नागेश होनगेकर व राहूल मजूकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन अष्टेकर यांनी उत्तमरीत्या केले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24