लाखो रुपयाचा आर्थिक व्यवहार करून शिक्षक भरती
मराठा मंडळ संस्थेच्या सरकारी अनुदानित शाळांमध्ये लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करून शिक्षकांची भरती करण्यात येत असल्याची तक्रार आज पत्रकार परिषदेत शाळेच्या शिक्षिका अक्षता नायक मोरे यांनी केली.
सदर पत्रकार परिषद कन्नड साहित्य भवन येथे पार पडली यावेळी त्यांनी मराठा मंडळ शिक्षण संस्थेत गदारोळ करत असल्याचा आरोप केला. तसेच यासंबंधीची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना दिल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी डीडीपीआय व विवो ने या प्रकरणी खोलवर चौकशी करून सदर संस्थेवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले.
त्यावेळी अक्षता नायक म्हणाले की गेल्या नऊ वर्षापासून बारा लाखात सरकारी नोकरी देतो म्हणून खोटे आश्वासन देऊन संस्थेत तीन हजाराच्या तुटतपूजा पगारात काम करून घेतले शिवाय मेरीट मध्ये टॉपर असून देखील सातव्या क्रमांकावर असलेल्या अन्य उमेदवारास लाखो रुपयांचा मोठा आर्थिक व्यवहार करून सरकारी नोकरी देण्याचे ठरविले आहे साफ चुकीचे असून माझ्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे मला न्याय द्यावा अशी मागणी शिक्षिकेने केली.