NCC संचालनालय कर्नाटक आणि गोवा यांच्या तुकडीने अखिल भारतीय वायु सैनिक शिबिर (AIVSC-2023) दरम्यान आयोजित केलेल्या फायरिंग आणि एरोमॉडेलिंग स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे .
ही स्पर्धा NCC संचालनालय कर्नाटक आणि गोवा येथे आयोजित करण्यात आले होते.यावेळी 12 पदकांच्या अभूतपूर्व विजयामुळे कर्नाटक आणि गोव्याने ‘सर्वोत्कृष्ट हवाई दल’ साठी वायु सेना ट्रॉफी जिंकली आहे .तसेच NCC संचालनालय महाराष्ट्राने ‘फर्स्ट रनर अप’ आणि प्रतिष्ठित ‘बेस्ट इन फ्लाइंग’ ट्रॉफीही पटकावली आहे
या शिबिरात देशभरातील ६०८ एअर विंग NCC कॅडेट्स एअर विंग NCC प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा एक भाग असलेल्या विविध स्पर्धांमध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना ‘सर्वोत्कृष्ट हवाई दल’साठी प्रतिष्ठित ‘वायू सेना ट्रॉफी’ जिंकली .
यामध्ये ड्रिल, स्कीट शूटिंग, 22 फायरिंग, एरो मॉडेलिंग तसेच फील्ड क्राफ्ट यासारख्या स्पर्धांमध्ये कॅडेट्स एकमेकांच्या विरोधात होते.NCC ग्रुप हेडक्वार्टर, बेलागावीच्या 8 कर्नाटक एअर स्क्वॉड्रनचे सात कॅडेट्स राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय वायु सैनिक शिबिर – 2023 मध्ये सहभागी झाले होते.
या सातपैकी कॅडेट ईशा गवळी आणि कॅडेट अंकित कुमार यांनी कंट्रोल लाइन इव्हेंटसाठी रौप्य पदक जिंकले आणि कॅडेट ओंकार पाटील आणि कॅडेट वैष्णवी जाधव हिने बेंगळुरू येथे झालेल्या एरोमॉडेलिंग स्पर्धेच्या रेडिओ कंट्रोल इव्हेंटसाठी कांस्य पदक जिंकले. याप्रसंगी कर्नल मोहन नाईक, ग्रुप कमांडर, एनसीसी ग्रुप बेळगाव, विंग कमांडर दीपक बल्हरा, कमांडिंग ऑफिसर 8 कर्नाटक एअर स्क्वाड्रन, बेळगाव यांनी कॅडेट्सच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि या कॅडेट्सचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे .