दुर्मिळ योग श्रावण शनी अमावास्या, दि. २३ ऑगस्ट
श्रावण मास हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि श्रावण मासातील शनी अमावस्येला अनन्य साधारण महत्व आहे.शनी देव या दिवशी आपल्या भक्तांना अभय देतो असा भविष्य पुराणात उल्लेख आहे.शनी अमावस्ये निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी श्री शनी महाराजांचे दर्शन घेतल्यास साडेसातीची दाहकता कमी होते. व्यवहारात अडकलेले पैसे, प्रलंबित असलेली कोर्टाची कामे, व्यवसाय, करिअर,कर्ज मुक्ती यासाठी सगळ्या राशीच्या व्यक्तींनी शनी अमावस्येच्या दिवशी श्री शनी देवाचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास त्या दिवशी उपवास करावा.साडेसातीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी त्या दिवशी देवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करावे. नोकरी आणि व्यवसायात त्रास जाणवत असल्यास देवाचे दर्शन घेऊन जप केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. शनी अमावस्येच्या दिवशी तेल, लोखंडी वस्तू, वस्त्र दान करणे लाभदायक ठरते. शक्य असेल त्यांनी गरिबांना अन्नदान करावे.या दिवशी श्री शनी देवाची आराधना केल्यास अनेक समस्या पासून मुक्तता होते.
शनी अमावस्ये निमित्त मंदिरात तैल अभिषेक, तीळ होम, शनी शांती, प्रसाद सेवा, अलंकार सेवा यांचे मंदिरात आयोजन करण्यात आले आहे. अभिषेक आणि अन्य सेवा करू इच्छिणाऱ्या भक्तांनी मंदिरात संपर्क साधावा.
विलास अध्यापक
ट्रस्टी, पुजारी मोबाईल – 9480417688