येळ्ळूर परिसरात रंगपंचमी उत्साहात
बेळगाव प्रतिनिधी:
येळळूर आणि परिसरामध्ये बुधवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
रंग स्नेहाचा रंग ,आपुलकीचा, रंग बंधांचा , रंग नात्यांचा असे म्हणत रंगांची बरसात करत तरुण , लहान मुले आणि महिलांनी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली.
https://dmedia24.com/the-unfortunate-death-of-two-children-by-drowning-in-the-well/
सकाळपासून सुरू झालेली रंगपंचमी दुपारी उशिरापर्यंत सुरू होती. एकमेकांवर रंगांची उधळण करत आणि पाण्याचा फवारा मारत आणि संगीताच्या तालावर फिरकत तरुणांनी रंगपंचमी साजरी केली. यावर्षी पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी न होता सातव्या दिवशी रंगपंचमी साजरी झाली. सकाळच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी होती दुपारनंतर पुन्हा शाळा सुरू होत्या. रंगपंचमी निमित्त मंगळवारी रात्री पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते.