येळ्ळूर परिसरात बुधवारी रंगपंचमी
बेळगाव प्रतिनिधी:
येळ्ळूर आणि परिसरामध्ये बुधवार दि. 19 मार्च रोजी रंगपंचमी साजरी होणार आहे.
यावर्षी रंगपंचमी नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी बालचमू आणि युवा वर्ग सज्ज असल्याचे चित्र दिसत आहे. रंगपंचमीसाठी लागणारे विविध रंग दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. रंगांच्या खरेदीची मागणी वाढली आहे. फक्त एकच दिवस रंगपंचमीच्या तयारीसाठी शिल्लक असल्याने युवा वर्गाची धावपळ सुरू झाली आहे.
दरवर्षी येळ्ळूर आणि परिसरामध्ये विविध रंगांची उधळण करत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात येते. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशी पार्टीचा बेत आखला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत विविध रंगांची उधळण करत संगीताच्या तालावर रंगपंचमी खेळली जाते. लहान थोर, युवा वर्ग सर्वजण रंग बरसे असे म्हणत रंगांची उधळण करतात. एकूणच एकमेकाला रंग लावून रंगपंचमीचा आनंद द्विगुणीत केला जातो.