रमाकांत कोंडुसकर व अमर येळ्ळुरकर यांनी आपला अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करून केला दाखल
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडूसकर आणि बेळगाव उत्तरचे उमेदवार अमर येळुरकर यांनी आपले उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करून दाखल केले.
बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना मिरवणुकीला प्रारंभ झाला.हजारो मराठी भाषिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला कार्यकर्ता घोड्यावर स्वार झाला होता.भगवे फेटे,भगव्या टोप्या परिधान करून आणि हातात भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.
रमाकांत कोंडूसकर आणि अमर येळुरकर सजवलेल्या बैलगाडीतून जनतेला अभिवादन करत होते.यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.उन्हाची तमा न बाळगता मराठी भाषा,संस्कृती यांचे दर्शन घडवण्यासाठी आणि मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी भाषिक एकवटले असल्याचे पाहायला मिळाले.