राकस्कोप धरण 75.70% भरले; दोन दरवाजे चार इंचांनी उचलले
बेळगांव:सध्या पावसाच्या पाण्यामुळे राकस्कोप धरण 75.70 टक्के भरलेले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाचे दोन दरवाजे उचलण्यात आले आहेत. यामध्ये दरवाजा क्रमांक एक व पाच हे प्रत्येकी चार इंचाने उघडण्यात आल्याची माहिती धरणाचे कर्मचारी लक्ष्मण पाटील यांनी दिली.
पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि पाणीपातळी आणखी वाढल्यास धरणाचे सर्व दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, मार्कंडे नदीकाठावरील गावांनी याची खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाचा पुढील चार दिवसांचा जोर लक्षात घेता, नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.