बेळगांव:नुकत्याच झालेल्या सामुदायिक कार्यक्रमात, आमदार आसिफ सैठ यांनी रामतीर्थ नगर येथे भेट देऊन स्थानिक महिला मंडळासोबत बैठक घेतली. या कार्यक्रमात राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली आणि महिलांच्या सक्षमीकरणाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले.
याप्रसंगी राजू शेठ यांनी राखी पौर्णिमेचे महत्त्व व भावा बहिणीचे नाते याबद्दल महत्त्व पूर्ण मार्गदर्शन केले.महिला मंडळ तसेच महिलांच्या समस्यांवर भर देत त्यांना सहाय्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले तसेच या उत्सवानिमित्त समानता आदर आणि मूल्य पुन्हा एकदा ठासून सांगितले.
त्यांनी महिलांसाठी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली, शैक्षणिक कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य योजनांचा समावेश आहे. या योजनांना अधिक प्रभावी बनविण्यासाठी आणि महिलांच्या समस्यांना सामोरे सामोरे जाऊन ते सोडून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.