This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  

| Latest Version 9.4.1 |

Local News

**समता, बंधुता यांची शिकवण देणारे राजश्री शाहू महाराज : कवी प्रा.निलेश शिंदे* : 

**समता, बंधुता यांची शिकवण देणारे राजश्री शाहू महाराज : कवी प्रा.निलेश शिंदे* : 
D Media 24

*राजश्री शाहू महाराजांचे विचार सर्व भारतीयांनी जर घेतले तर जागतिक महासत्ता भारत होऊ शकतो : कवी प्रा. निलेश शिंदे*

**समता, बंधुता यांची शिकवण देणारे राजश्री शाहू महाराज : कवी प्रा.निलेश शिंदे* :

 

*भारतीय बौद्ध महासभा, एमए समिती, अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद-एल्गार परिषद, शाहू फुले आंबेडकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री छ. शाहू महाराज यांची 149 वी जयंती आणि त्यानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन*

बेळगाव तारीख, 26 जून 2023 :आरक्षणाचे जनक: शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, आरक्षण, समता, आणि बंधुता अशा विविध गोष्टींसाठी त्यांना आठवले जाते. पण अनेकांना शाहू महाराज यांच्याविषयी पुरेसे माहिती नाही. छत्रपती शाहू महाराजांनी राज्याची सूत्रे हातात घेताच त्यांनी राज्य आणि समाजावरील ब्राह्मणांचे वर्चस्व मोडून काढले होते. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. महाराजांच्या वडिलांचे नाव जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. तर त्यांची आईचे नाव राधाबाई होते समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज 149 वी जयंती साजरी केली जात आहे. सामान्य लोकांना सामाजिक न्याय मिळावा. प्रत्येक नागरिकांना समान न्याय मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांना आठवले जाते. महाराजांची आज 149 जयंती आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. महाराजांच्या वडिलांचे नाव जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. तर त्यांची आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मूळ नाव हे यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, हे कोल्हापूरचे शाहू व चौथे साहू अशा विविध नावाने प्रसिद्ध होते. 26 जुलै 1902 रोजी भारतीय इतिहासात त्यांनी ते केले जे कोणीही कल्पना केली नसेल. शाहूजी महाराजांनी 26 जुलै रोजी चित्पावन ब्राह्मणांच्या तीव्र विरोधानंतर आपल्या राज्यात दलित-मागासांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण लागू केले. म्हणूनच शाहूजींना आधुनिक आरक्षणाचे जनक म्हटले जाते. पुढे बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनी भारतीय संविधानात शाहूजींनी लागू केलेल्या आरक्षणाचा विस्तार केला. आधुनिक भारतातील जातीवर आधारित हे पहिले आरक्षण होते. त्याचप्रमाणे

महाराजांनी हिंदू वारसा हक्काचा निर्बंधावर मोठा निर्णय घेतला. शूद्रांची अनौरस संतती आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रिवर्णांची अनौरस संतती यांच्या वारसाहक्कातील तफावत महाराजांनी नष्ट केली.महाराजांनी केलेले कार्य : शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांचे वृत्तपत्र मूकनायकला सहकार्य केले. शाहू महाराजांना सामाजिक कार्य करणारा राजा असं म्हटलं जाते. त्यांनी समाजातील अनेक रुढी, परंपरा नष्ट केल्या. यामुळे राज्य सरकार शाहू महाराजांचा जन्म दिवस हा 2006 पासून”सामाजिक न्याय दिन”

म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा, स्त्री पुनर्विवाह कायदा, आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा करत त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला होता. *असे प्रतिपादन कवी प्रा. निलेश शिंदे यांनी “”शाहू महाराज जीवनकार्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्व एक चिंतन”” या विषयावर विशेष असे मार्गदर्शन केले*

भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखा, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद आणि एल्गार परिषद बेळगाव, शाहू फुले आंबेडकर सोशल फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांची 149 वी जयंती आणि त्यानिमित्त विशेष व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले होते प्रमुख वक्ते म्हणून बेळगांव येथील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. के. डी. मंत्रेशी आणि कवी प्रा. निलेश शिंदे बेळगांव यांनी “”शाहू महाराज जीवनकार्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्व एक चिंतन”” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन सदाशिवनगर बेळगांव येथील बुद्ध विहार आंबेडकर भवन या ठिकाणी करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष समाजसेवक यमनाप्पा पी. गडीनाईक उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते निंगाप्पा विठ्ठल जाधव , समितीचे नेते आणि माजी नगरसेवक अनिल पाटील , रमाकांत मेत्री यांनी फोटो पूजन केले.

दीप प्रज्वलन सेक्रेटरी राजेंद्र कांबळे, प्रमुख वक्ते प्रा. के.डी. मंत्रेशी, प्रा. निलेश शिंदे, जीवन कुरणे, समितीचे कार्यकर्ते नारायण सांगावकर , सुधिर चौगुले, महादेव तळवार, लक्ष्मण नाईक, मल्लिकार्जुन राशिंगे, अनंत कोलकार यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विद्यानिकेतन शाळेचे शिक्षक सहदेव कांबळे यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत गायन केले.

यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटील, एपीएमसी चे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, प्रा. के. डी. मंत्रेशी, प्रा निलेश शिंदे यांनी वेगवेगळ्या शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित जीवन पटावर आधारित मार्गदर्शन केले.

स्वागत नारायण सांगावकर यांनी केले. प्रस्ताविक शाहू – फुले-आंबेडकर सोशल फाउंडेशनचे सचिव भीमा कांबळे यांनी केले. परिचय नागेंद्र कांबळे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे व जीवन कुरणे यांनी केले. तर सागर गुंजीकर यांनी आभार मानले. यावेळी आनंद कोडसंगी, गंगाराम अंकलगी, लक्ष्मण नाईक, महादेव तलवार सिद्धाप्पा कोलकर, अनंत कोलकर, , एम आर शेट्टी, चांगदेव हुवाप्पणावर,

मरप्पा हुवाप्पणावर, जोतिबा निंगाप्पा पाटील, अजित पाटील, श्रीधर पाटील,सिद्धाप्पा कांबळे,

विजय पाटील, उदय पाटील, नारायण पाटील, तसेच वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply