बेळगाव:राजमाता जिजाऊ संस्कृती प्रतिष्ठान व जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थापक डॉ सोनाली सरनोबत यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जिजाऊ ब्रिगेड हे महिलांना एकत्रित करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम करते. तसेच महिलांना शिलाई मशीन, शेवया बनवायची मशीन देऊन सहकार्य केले आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती दिली आहे.कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद चे जिल्हाध्यक्ष डॉ सोनाली सरनोबत आहेत. जिजाऊ ब्रिगेड हे एक त्याचा विभाग आहे.
याप्रसंगी डॉ सोनाली सरनोबत गीतांजली चौगुले दिपाली मलकरी, कांचन चौगुले विद्या सरनोबत, नम्रता उंदरे, वृषाली मोरे, अशाराणी निंबाळकर उपस्थित होत्या