*डॉ रवी पाटील यांच्या डबा डबल इंजिन सरकारला लावा*
भारतीय जनता पक्षाचे उत्तर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार डॉ.रवी पाटील यांच्या वतीने शहरातील टिळक चौकात आयोजित जाहीर प्रचार सभेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची तत्वे ही नेहमीच राष्ट्रहिताची असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचे आवाहन केले. तसेच कर्नाटक डबल इंजिन सरकला निवडून आणून द्यावे त्याच बरोबर उत्तरचा डॉ रवी पाटील यांचा डब्बा हा डबल इंजिन ला जोडावा असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले त्याचबरोबर पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. रवी पाटील यांना पाठिंबा द्या. 10 मे रोजी भारतीय पक्ष सर्वत्र विजयी होईल आणि बहुमताने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, उपमहापौर रेश्मा पाटील, मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित होते.