This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेळगाव – पणजी महामार्गावर दिशादर्शक फलक मराठी मध्ये लावा, अन्यथा टोल देणार नाही : म. ए. युवा समिती* 

*बेळगाव – पणजी महामार्गावर दिशादर्शक फलक मराठी मध्ये लावा, अन्यथा टोल देणार नाही : म. ए. युवा समिती* 
D Media 24

*बेळगाव – पणजी महामार्गावर दिशादर्शक फलक मराठी मध्ये लावा, अन्यथा टोल देणार नाही : म. ए. युवा समिती*

 

बेळगाव ते गोवा या नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -७४८ चे काम पूर्णत्वास आले असून आता ठीकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत पण सदर फलक फक्त कानडी आणि इंग्रजी भाषेत लावण्यात आले असून त्यामध्ये मराठीला स्थान दिले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या रस्त्यासाठी मराठी शेतकऱ्यांनीच आपल्या शेत जमिनी दिल्या आहेत. बेळगाव आणि खानापूर तालुक्यात मराठी भाषिक बहुसंख्य आहेत हे केंद्रीय रस्ते प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाला ठाऊक असून देखील मराठीला जाणीवपूर्वक वगळले गेले आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्याला जोडणारा महामार्ग असल्याने परराज्यातून हजारो प्रवाशी आणि मालवाहतूक वाहनांची ये जा रोज होत असते पण महाराष्ट्र आणि गोवा मधून येणाऱ्या चालकांना इंग्रजी – कानडी भाषेचे ज्ञान नसल्याने स्थानीक लोकांना विचारून पुढे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक श्री एस. एम. नाईक यांना बेळगाव – पणजी महामार्गावर दिशादर्शक फलक मराठी मध्ये लवकरात लवकर लावण्यात यावे अन्यथा या महामार्गावर मराठी भाषिक टोल भरणार नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व्यवस्थापकांना सांगितले.

व्यवस्थापक श्री एस. एम. नाईक यांनी निवदेन स्वीकारून, बेळगाव – पणजी महामार्गावर मराठी भाषेत फलक लावण्यासाठी बेंगळूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालय आणि विभागीय कार्यालय धारवाड यांच्याशी पाठपुरावा करून मागणीची पूर्तता केली जाईल असे आश्वासन म. ए. युवा समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

यावेळी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष श्री अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा नेते शुभम शेळके, सुरज कुडुचकर, सचिन केळवेकर, किरण मोदगेकर, वासू सामजी, आनंद पाटील, विनायक कावळे, प्रवीण रेडेकर आणि मनोहर संताजी आदी उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply