कर्नाटक सरकारने गृहिणींना मदत म्हणून गृहलक्ष्मी योजना सुरू केली असली तरी सुतट्टी (ता. रायबाग जि. बेळगाव) गावातील एका वृद्धेने स्वतःला मिळालेले गृहलक्ष्मी योजनेच्या मिळालेल्या पैशातून संपूर्ण गावाला पुरणपोळीचे जेवण घातल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.
रायबाग तालुक्यातील सुतट्टी गावातील अक्काताई लंगोटी या वृद्धेने गृहलक्ष्मी योजनेतून मिळालेल्या पैशातून संपूर्ण गावाला जेवण दिले आहे. इतके करून न थांबता या आजींनी पाच सुहसिनिंची ओटी भरून काही महिलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या आहेत.गावातील मंदिरात पूजा अर्चा देखील केली आहे.
राज्यातील गृहिणी महिलांसाठी दर महिना 2 हजार रुपये देण्याची गृहलक्ष्मी योजना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुरू केली आहे.या पद्धतीने महिलांचे भले चिंतणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भविष्यात राजकारणात वरचे पद मिळावे याकरिता ग्रामदैवताची पूजा करून आपण संपूर्ण गावाला पुरणपोळीचे जेवण घातल्याचे आक्काताई लंगोटी यांनी सांगितले.