पी यु सी द्वितीय वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा
साऊथ कोकण एम्पावरमेंट चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने पी यु सी द्वितीय वर्षात उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा
सालाबाद प्रमाणे या वर्षी ही बेळगाव शहरातील बारावी वार्षिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे सम्मान आणि पारितोषिक, रोख रक्कम रूपात देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डाॅ.एस.रोहितराज,जैन काॅलेज आफ इंजिनियरींग एम.बी.ए.विभाग प्रमुख ,अध्यक्ष स्थानी एस के ई सोसाइटीचे व्हाईस चेअरमन श्री एस. वाय.प्रभू हे होते ,तसेच मंचावर श्री मधुकर सामंत, कर्नल चद्रनील पी रामणाथकर, श्री मदन कलबुर्गी, प्राचार्य एस एन देसाई, प्रा.सचिन पवार. उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सृष्टी बागेवाडी या विद्यार्थीनीच्या स्वागत गीताने झाली, प्राचार्य एस एन देसाई यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, पालक वर्ग, संस्थेचे पदाधिकारी,प्राध्यापक आणि विद्यार्थी याचे स्वागत केले. रेशमा सप्ले यांनी प्रमुख पाहुणेचा परिचय करवून दिला.
प्रमुख पाहुणे मंचावरून बोलते वेळी जीवनात अनेक संकटे येतात त्यांना सामोरे जाऊन आपले लक्ष गाटावे,जीवनात गुरूचा मान राखवा,संस्थेचे आभार मानले, आज काळाची गरज आहे की होतकरू विद्यार्थ्यास आर्थिक सबलता देने गरजेचे आहे,हे सुप्त कार्य ही संस्था करीत आहे.
यावेळी आर एल एस विज्ञान शाखेचा विद्यार्थी कृष्णा मुरकुटे यास रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले, तसेच गोगटे विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कृपा जाधव या विद्यार्थीनीस ही रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
साऊथ कोकण एम्पावरमेंट चॅरिटेबल फाऊंडेशन च्या वतीने जी एस एस पी यु काॅलेजचे विद्यार्थ्याचे,तसेच आर पी डी पी यु काॅलेज कला आणि वाणिज्य शाखेच्या व्दितीय वर्षाचे उत्कृष्ट विद्यार्थी वर्गाचे रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
श्री रूस्तम दर्शाव रूतनजी उर्फ गोलखारी पारितोषिक, अवंती एन कनगुतकर, वैष्णवि मुट्टनगी,रक्षीता तळेगाव, सृष्टी पाटील यांना देण्यात आले. या व्यतिरिक्त विविध विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त विद्यार्थ्याचे ही रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आले.
कलबुर्गी शिष्य वृती विशेष पटेगार समाजातील विद्यार्थी वर्गास देऊन गौरवण्यात आले. अध्यक्ष श्री एस वाय प्रभू यांनी विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन केले तसेच भावि भविष्यात किर्ती वंत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी पारितोषिक वितरण नियोजन प्रा. नितीन भातकांडे आणि विद्यार्थी सहाय्यक मंडळी यांनी केले . सूत्र संचलन डाॅ.किर्ती फडके, प्रा. शुभदा मंगोळी,प्रा. साक्षी कुलकर्णी यांनी केले