शहरातील खाजगी भाजी मार्केटच्या विरोधात छेडले आंदोलन
शहरातील खाजगी भाजी मार्केटच्या विरोधात आज एपीएमसी भाजी मार्केट व्यापारी संघटनेतर्फे सकाळी बेळगाव महापालिकेसमोर आंदोलन छेडले .यावेळी त्यांनी खाजगी भाजी मार्केटच्या बेकायदेशीर स्थापनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी. अशी मागणी केली .
यावेळी त्यांनी हे खाजगी भाजी मार्केट रद्द केले जावे,अशी मागणी निवेदनाद्वारे केली .याचबरोबर भाजी व्यापाऱ्यांनी धरणे सत्याग्रह करून जोरदार निदर्शने केली.
यावेळी उपस्थितांनी खाजगी भाजी मार्केट स्थापनेतील गैरप्रकाराची चौकशी व्हावी खाजगी भाजी मार्केट रद्द करावे, अशा घोषणा दिल्या .
तसेच या व्यापाऱ्यांच्या वतीने संघटनेच्या नेत्यांनी मनपा आयुक्तांना उपरोक्त मागणीसह विविध 24 मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून आयुक्तांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे यावेळी आयुक्तांनी दिले.
याप्रसंगी आंदोलनात एपीएमसी मधील जवळपास 200 व्यापारी सहभागी झाले होते.या सर्वांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.तसेच या निवेदनाची प्रत एपीएमसी भाजी मार्केट व्यापारी संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, शहर विकास मंत्री, प्रादेशिक आयुक्त आदींना पाठविण्यात आले .