खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज सकाळी खानापूर येथील शिवस्मारक येथे पार पडली, या बैठकीच्या अध्यक्षांनी खानापूर समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील हे होते,
एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषांतर प्रांत रचना झाली त्यावेळच्या मुंबई प्रांतातील निपाणी, बिदर, भालकी, बेळगाव, खानापूर, सुपा, कारवार, असा बहुसंख्येने मराठी भाषिक असणारा भूभाग कर्नाटकाला जोडून केंद्र सरकारने महाराष्ट्रावर व मराठी भाषेवर अन्याय केला, त्यादिवशी पासून एक नोव्हेंबर सुतक दिन म्हणून सीमा भागातील मराठी भाषिक आज पर्यंत पाळत आलेले आहेत, येणारा एक नोव्हेंबर हा खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी कडकडीत हरताळ म्हणून पाळावा,असे आवाहन ज्येष्ठ नेते संभाजी देसाई यांनी केले, काही दिवसांपूर्वी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी भाषिकांनी एक नोव्हेंबर रोजी निषेध व्यक्त न करता इतर दिवशी करावा असे सुचवले होते,त्यावर बोलताना खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सांगितले एक नोव्हेंबर 1956 पासून आज पर्यंत लोकशाहीने दिलेल्या हक्का नुसार आम्ही हा दिवस निषेध दिन म्हणून केंद्र सरकारचा निषेध करत आलेलो आहोत,यावर्षी सुद्धा केंद्र सरकारचा निषेध याच दिवशी होणार आहे, तरी लोकशाहीची गळचेपी होऊ नये असे विचार व्यक्त केले, मागील लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी कारवार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून सध्याचे खासदार श्री विश्वेश्वर हेगडे कागिरी यांनी समितीच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती त्यावेळी सुद्धा समितीच्या नेत्यांनी विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना आपले सातबारा उतारे मराठी मध्ये द्यावेत व शासकीय कारभार मराठीमध्ये चालावा असे सुचवले, पण निवडून आल्यानंतर त्यांनी सुद्धा तोंडाला पाणी पुसण्याची कार्य केले आहे असे माजी सभापती श्री सुरेश देसाई यांनी लक्षात आणून दिले,
येणारा एक नोव्हेंबर काळा दिन खानापुरातील मराठी भाषिकांनी कडकडीत पाळावा व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी एकत्र जमावे असे सांगितले, यावेळी पी.एच. पाटील, बळीराम पाटील, रवींद्र पाटील,दत्तू कुट्रे,बाळासाहेब चिनवाल व सचिव राजू पाटील आदी उपस्थित होते.