जनतेच्या सेवेसाठी तत्पर नगरसेवक नितीन जाधव; समस्येवर झटपट तोडगा काढत कमावला विश्वास
बेळगाव :
शहरातील स्थानिक प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करणारे नगरसेवक म्हणून नितीन जाधव यांनी पुन्हा एकदा आपली कार्यशैली दाखवून दिली आहे. आरपिडी सर्कलजवळील देशमुख रोडच्या कोपऱ्यावर निर्माण झालेली धोकादायक चर समस्या नागरिक आणि वाहनचालकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरत होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला यांना या ठिकाणी वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
स्थानिक नागरिक व ट्रॅफिक पोलिसांच्या विनंतीनंतर नितीन जाधव यांनी आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाही सुरू केली आणि अल्पावधीतच ती समस्या दूर केली.
या जलद कार्यपद्धतीबद्दल परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासनाने समाधान व्यक्त केले असून, “जनतेचा विश्वास संपादन करणारे आणि प्रत्यक्ष काम करून दाखवणारे नेतृत्व म्हणजे नितीन जाधव” अशा शब्दांत कौतुकही करण्यात आले.
त्यांच्या या प्रयत्नामुळे फक्त परिसर सुरक्षितच झाला नाही, तर जनता-केंद्रित नेतृत्व कसे असावे याचा आदर्शही निर्माण झाला आहे.