कर्नाटक सरकारच्या दादागिरीचा निषेध
सीमाप्रश्नी केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक १९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता व्हॅक्सिन डेपो टिळकवाडी बेळगांव येथे कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध म्हणून निषेधात्मक महामेळावा आयोजित केलेला होता. या महामेळाव्याला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार होते. परंतु बेळगांव जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक १८ डिसेंबर रोजी महामेळाव्याला परवानगी दिली, परंतु त्याच मध्यरात्री महामेळाव्याला परवानगी नाकारल्याचे पत्रक काढून १४४ कलम लागू करून मेळाव्याच्या ठिकाणी जाणारे सर्व मार्ग बॅरीकेड्स लावून बंद करण्यात आले. आणि महामेळाव्यासाठी उभारण्यात आलेला शामियाना पोलिस बंदोबस्तात आज १९ डिसेंबर रोजी सकाळी ९च्या आत उध्वस्त करून पोलीसांनी आपल्या ताब्यात घेतला.
एवढ्यावरच न थांबता बेळगांव जिल्ह्याच्या सर्व सीमा पोलिस बंदोबस्तात बंद करण्यात आल्या. महामेळाव्यासाठी सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष माननीय खा. श्री धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना प्रवेश बंदीचे आदेश काढले, त्याचबरोबर मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, ॲड. राजाभाऊ पाटील, रणजित पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तसेच महामेळाव्यासाठी सीमाभागातून उपस्थित राहीलेल्या महीला कार्यकर्त्यांसह पुरुष कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आले आहे. यासाठी खानापूर तालुक्यातुन माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभापती मारुतीराव परमेकर, यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, विठ्ठल गुरव, कृष्णा मण्णोळकर, रविंद्र शिंदे, जयवंत पाटील माजी पीएसआय, भुविकास बॅंकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, मर्याप्पा पाटील, रविंद्र देसाई, विठ्ठल देसाई, लक्ष्मण जांबोटकर, दत्ताजीराव मोरे सरकार, तानाजी कदम, नारायण कापोलकर, प्रभाकर बिर्जे, राजू लक्केबैलकर, दशरथ पाटील, हणमंत पाटील, चंद्रकांत कांबळे, कल्लाप्पा पाटील, वसंत नावलकर, हणमंत जगताप, खाचाप्पा काजुनेकर, नारायण मोहीते, अनंत चव्हाण, निंगाप्पा पाटील, आकाश मुळीक, दीपक देसाई, पिर्हजी पाटील, रावजी बिर्जे इत्यादींसह महामेळाव्याला हजर होते, परंतु पोलीसांच्या अडवणूकीमुळे खानापूला माघारी आले. आणि खानापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रकाश चव्हाण आणि यशवंत बिर्जे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून घटनेचे अधिकार पायदळी तुडवणार्या कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
त्यानंतर शिवस्मारक येथे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली. यावेळी आबासाहेब दळवी, मारुती परमेकर, जयराम देसाई, जयवंत पाटील, यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, मर्याप्पा पाटील, रविंद्र शिंदे, नारायण कापोलकर, इत्यादींनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. शेवटी दिगंबर पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात कर्नाटक सरकारच्या दादागिरीचा निषेध केला.