समर्पित खेळ भावना ध्यानचंदानी शिकविली-प्रा. राजू हट्टी
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात ध्यानचंदाच्या स्मृति दिना निमित्त खेळ दिवस साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी पदी क्रीडा शिक्षक प्रा. राजू हट्टी हे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.आर.एम. तेली यांनी भूषविले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.अर्चना भोसले यांनी प्रस्तावना सांगून उपस्थितांचे स्वागत केले.त्यानंतर ध्यानचंदाचे फोटो पूजन करून प्रमुख अतिथी प्रा.राजू हट्टी म्हणाले की, ध्यानचंद हे हॉकीचे जादूगर होते, आपल्या खेळाविषयी ते समर्पित भावनेतून आपला खेळ साकार करीत. खेळाविषयीची समर्पित भावना जिंकवते हे ध्यानचंदानी शिकविली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. आर.एम. तेली म्हणाले की, ध्यानचंदाच्या मुळे हॉकी मध्ये भारताचे नांव सुवर्ण पदकाच्या रूपाने खेळ जगतात कोरले गेले .ध्यानचंद येणाऱ्या युवा खेळाडूंच्या साठी प्रेरणादायक स्थान आहेत.
या कार्यक्रमाला प्रा. जी.एम कर्की, ग्रंथपाल सुरेखा कामुले, डॉ. डी.एम.मुल्ला, प्रा. भाग्यश्री रोकडे, डॉ.आरती जाधव, डॉ.वृषाली कदम,प्रा.वेदा शिवपुजीमठ, प्रा. मनोहर पाटील, प्रा.नूतन, प्रा.नागश्री,प्रा.लक्ष्मी आदी प्राध्यापक उपस्थित होते.शेवटी प्रा.भाग्यश्री चौगले यांनी सर्वांचे आभार मानले.