. *शिक्षण क्षेत्रात फोफावलेला भ्रष्टाचार रोखण्याकरिता आज काळाची गरज बनली आहे : अध्यक्ष रामू गुगवाड*
*कर्नाटक राज्य प्रौढ शाळा सहाय्यक शिक्षक संघ बेंगलोर यांच्या वतीने विधान परिषद सदस्य श्री एस व्ही यांच्याशी विशेष चर्चा करून संवाद साधला.: वेगवेगळ्या समस्यांच्या वरती जागृती मोहीम राबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.*
बेळगाव तारीख (): दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रात वाढत फुफावत जात असलेला भ्रष्टाचार हा समाजाला लागलेला कलंक आहे तो निपटून काढण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील चांगले आणि सक्षम होण्याकरिता शिक्षणातील प्रत्येक व्यक्तीने शिक्षकाने आणि शिक्षण व्यवस्था आणि शासनाने सुद्धा अतिशय गंभीर देणे याच्यावर चिंतन म्हणून करणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचार रोखण्याकरिता आज काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आणि समाजसेवक श्री रामू गुगवाड यांनी व्यक्त केले.
*बेळगाव चनामा सर्कल येथील मिलन हॉटेलमध्ये चर्चा करण्यात आली. विधान परिषद चे सदस्य श्री. संकनुर सर बेळगाव खाजगी दौऱ्यावर आले असता दौऱ्यावर आले असता शिक्षकांची संवाद साधला आणि शिक्षण क्षेत्रातील आणि शिक्षण यांच्या समस्या सोडवण्याकरिता विशेष चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.*
कर्नाटक राज्य प्रौढ शाळा सहाय्यक शिक्षक संघ बेंगलोर आणि बेळगाव शाखेच्या वतीने विधानपरिषद सदस्य श्री संकुल सर यांच्या विशेष बैठकीमध्ये शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या समस्या बाबत गंभीर चर्चा करण्यात आल्या ह्या बैठकीचे अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष स्थानी श्री रामू गायकवाड होते.
यावेळी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री रामू गुगवाड, एस.एम. पाटील, अशोक खोत, प्रविण होसुर, श्री धुलाप्पणवर,
विशाल चौगुले , प्रा लक्ष्मण बांडगे, प्रा.एन.एन. शिंदे, प्रा. उदय पाटील, सुनिल मादार, सतिष पाटील या सह शिक्षक संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी सदस्य शिक्षक उपस्थित होते.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या समस्या आणि शिक्षण व्यवस्थेतील अडीअडचणी दूर करण्याकरिता वेगवेगळ्या विषयांच्या वरती चर्चा करण्यात आल्या.
1. खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळेतील खाली पदे भरण्यासाठी मागणी करण्यात आली आणि शिक्षकांच्या वयोमर्यादा मध्ये वय वाढवून देण्याकरिता विशेष शिक्षकांच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी कोणत्या प्रकारचा त्यांच्यावरती अन्याय होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
2. खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना आरोग्य संजीवनी विमा योजना लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आल्या त्या सर्वांसाठी उपयोग करून घेण्याकरिता विशेष जागृती केली जाणार आहे आणि सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत यावर चर्चा करण्यात आली.
3. इयत्ता आठवी विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन परीक्षा घेण्यासंदर्भात अत्यंत गंभीर चर्चा करण्यात आल्या आणि त्यांच्यापासून होणाऱ्या विशेष अनेक अडचणी दूर करण्याकरिता शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने सोयीस्कर होईल या दृष्टिकोनातून मूल्यांकन पद्धतीचे मार्गदर्शन शिबिर राबवून त्याबद्दल जागृती करण्यात संदर्भात विशेष चर्चा करण्यात आली.
3. सरकारी आणि अनुदानित माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांची बदली करण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली.
4. शिक्षकांच्या काल्पनिक वेतन देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आणि ती वेतन योग्य वेळी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
5.. खाजगी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळेमधील डी दर्जा नोकरांना भरती करण्यासंदर्भात आणि अनुकंपा आधारित भरती प्रक्रिया रोखली आहे त्यांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याकरिता विशेष चर्चा करून विशेष त्यांना नेमणुकी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
6. शिक्षण खात्यामध्ये होत असलेला वेळोवेळी भ्रष्टाचार तो रोखण्याकरिता काय करता येईल उपाययोजना कशा पद्धतीने अमलात आणता येतील यासाठी विशेष चर्चा करून भ्रष्टाचार निर्मूलन करण्याकरिता विशेष चर्चा करण्यात आल्या आणि अत्यंत गंभीर अशा चर्चा करून शिक्षण व्यवस्थित भ्रष्ट व्यवस्थापन बदलून परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशी विशेष चर्चा करण्यात आली.
7. कर्नाटक राज्य मधील अतिथी शिक्षकांच्या नेमणूक न करता त्यांना कायमस्वरूपी नेमणूक करून सरकारी नोंद नेमणूक करून वेगवेगळ्या शाळांच्या वरती पाठवून द्यावे यासाठी चर्चा करण्यात आली. अतिथी शिक्षक हा तात्पुरता काळ भागवण्याकरिता गेल्या दहा पंधरा वर्षांपासून तात्पुरता पर्याय शोधण्याचा प्रयत्न सरकार करत आहे तो बंद पाडून कायमस्वरूपी ची सरकारी शिक्षकांची नेमणूक केली जावी यासाठी विशेष चर्चा करून सरकार दरबारी हे विषय मांडण्यासाठी सांगण्यात आले लवकरात लवकर शिक्षक भरती व्हावी कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी रिकामी जागा आहेत त्या लवकरात लवकर भरावे याकरिता मागणी करण्यात आली.
अतिथी शिक्षकांचा तात्पुरता पर्याय खोडून काढून तिथं कायमस्वरूपी शिक्षकांच्या नेमणुकी कराव्यात सरकारने याच्यावरती गंभीर दखल घेऊन त्याच्यामध्ये मागणी पूर्ण करावी असे शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.
कर्नाटक राज्यातील अतिथी शिक्षकांचे वेळेत वेतन दिले जात नाही यासाठी वेळोवेळी आंदोलने केली जात आहेत त्यांचे वेतन न थकवता योग्य वेळेत दिले जावे यासाठी चर्चा करण्यात आल्या.
बेळगाव जिल्ह्यातील अतिथी शिक्षकांनी गेल्या दोन चार दिवसांपूर्वी बेंगलोर येथे आंदोलन करत आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना न्याय अजिबात मिळाला नाही यासाठी विशेष असे चर्चा करून त्यांच्यावरती होणारा अतिथी शिक्षण शिक्षकांच्या वर होणारा अन्याय दूर केला जावा आणि पर्यायी कायमस्वरूपी भरती व्हावी यासाठी संकलूर विधानपरिषद सदस्य यांच्याकडे मागणी करण्यात आली.